You are currently viewing जेष्ठ नागरिक संघाचे एक दिवसीय साहित्य संमेलन भव्यदिव्य स्वरूपात संपन्न 
Oplus_16908288

जेष्ठ नागरिक संघाचे एक दिवसीय साहित्य संमेलन भव्यदिव्य स्वरूपात संपन्न 

प्राधिकरण निगडी –

सौ. शर्मिलाताई बाबर उपमहापौर पिं.चिं.मनपा आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांचे साहित्य संमेलन रविवार दिनांक ४ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ , निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहामध्ये संपन्न झाले.

सकाळी सावरकर भवन ते मनोहर सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात टाळ,नृत्य, रिंगण, शंखनाद, फुगड्या खेळत ज्येष्ठांनी आनंद लुटला.

प्रमुख वक्ते डॉ.श्री संजय उपाध्ये, सौ. शर्मिलाताई बाबर, श्री.राजेंद्र बाबर,अनुराधा गोरखे,आणि संघाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.सौ.तेजश्री अडीगे यांच्या शिष्यांनी गणेश वंदना सादर केली. मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार श्री.बाबू डिसोजा, सतीश सगदेव ,श्री मनोज महाजन यांचाही श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पहिल्या सत्रात परिसंवादात कालची पिढी चांगली की? आजची पिढी चांगली, यामध्ये पद्मावती कुलकर्णी,सौ स्मिता देशपांडे, श्री.सुभाष भंडारे, श्री. शामसुंदर परदेशी,श्री,नरेंद्र मिसाळ, सौ ज्योती कानेटकर यांनी सहभाग घेतला.

याचे सूत्रसंचालन सौ.समिता टिल्लू यांनी केले.सौ. अर्चना वर्टीकर लिखित पोवाडा सौ.पौर्णिमा कासार व सौ कमल जगताप यांनी सादर केला. त्याला वाद्याची साथ श्री मंगेश वर्टीकर यांनी दिली.

वक्ते डॉ .श्री संजय उपाध्ये यांचा परिचय सौ.वृषाली गुर्जर यांनी केला त्यानंतर त्यांचे उद्बोधक व्याख्यान झाले. बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यावर आधारित गोफनृत्य सादर करण्यात आले.सौ.अजया जोशी,सौ.शीतल कुलकर्णी, सौ अनुराधा तेंडुलकर सौ आशा नष्टे सौ अंजली कुलकर्णी श्रीमती कुंदा कोळपकर,सौ . सुनिता यन्नुवार व अस्मिता तारकुंडे यांनी केले.याचे वाचन सौ.अर्चना वर्टीकर व गायन सौ.स्मिता फडणीस यांनी केले.श्री.विश्वास फडणीस यांनी बहिणाबाईंचे चित्र रेखाटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना वर्टीकर यांनी केले.उपाध्यक्ष श्री दिलीप गोसावी यांनी आभार मानले.

स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्रात सौ.अर्चना वर्टीकर लिखित अजून त्या झुडपांच्या मागे या नाटकात श्री. मुकुंद जोशी,श्री नरेंद्र मिसाळ,श्री.मंगेश वर्टीकर,सौ. स्वाती शितुरकर सौ,वर्षा सिंगलवार यांनी काम केले. त्याचे नेपथ्य श्री, शिवाजी जक्का व श्री.विश्वास फडणीस यांनी केले. यानंतर कवी कट्टा संपन्न झाला.श्रीकांत बांदिवडेकर, सौ.माधुरी डिसोजा, सौ.आशा नष्टे,श्री.शशिकांत कोंढारे, सौ.शितल कुलकर्णी, सौ. कमला खळदकर,सौ.वृषाली गुर्जर व श्री विजय पापत यांनी कविता सादर केल्या.

शेवटी सौ.तेजश्री यांच्या शिष्यांनी गोंधळनृत्य सादर केले. श्री मंगेश वर्टीकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा