You are currently viewing स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सिंधुदुर्ग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण (Renewal) अर्ज ऑनलाइन भरण्यास दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी कळविले आहे

जिल्ह्यातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर नूतनीकरणाचा अर्ज ऑनलाइन भरावा.

योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तसेच अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. मागील अभ्यासक्रमात ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४० टक्के आहे. सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेचा अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ साठी नूतनीकरणाचा अर्ज भरताना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करून चालू अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करावी. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची PDF प्रत तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दि. १६ ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत नजीकच्या मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह, संबंधित महाविद्यालय किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे सादर करावा.

जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीची माहिती देऊन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास अंतिम मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालयाशी ०२३६२-२२८८८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा