You are currently viewing आप्पांच्या गप्पा

आप्पांच्या गप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी श्री विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आप्पांच्या गप्पा* 

 

*मधुमेह आणि वजन वाढीचे एक कारण* 

 

मधुमेह प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यांमुळे होतो. त्यामुळे तो जंतू किंवा विषाणूंसारखा बाहेरून लागलेला आजार नसून जीवनशैलीतील दोष मानला जातो. हा पूर्णपणे बरा होणारा संसर्गजन्य आजार नसला, तरी योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांमुळे तो औषधांशिवाय किंवा कमी औषधांवर नियंत्रणात (Remission) ठेवता येतो. मधुमेह होण्याचे एक कारण हल्लीचे रात्री उशिरा जेवण असल्याचे आढळून आले आहे.

 

आयुर्वेदानुसार रात्री उशीरा जेवल्याने शरीरात आळस आणि कफ दोष वाढतो.

 

कारणे:मंदावलेला अग्नी: सूर्यास्तानंतर शरीराचा पचन अग्नी (अग्नि) मंद होतो. अशा वेळी उशीरा जेवल्यास अन्न नीट पचत नाही.

 

कफ वेळेचा प्रभाव: संध्याकाळी ६ ते रात्री १० ही कफ दोषाची वेळ मानली जाते. या वेळेत जड किंवा उशीरा जेवण केल्याने कफ तीव्र होतो.

 

आमाची निर्मिती (विषारी घटक): न पचलेले अन्न शरीरात ‘आमा’ (toxins) तयार करते, ज्यामुळे जडपणा, सुस्ती आणि आळस जाणवतो.

 

सकाळचा परिणाम: दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शरीरात जडपणा, थकवा आणि जास्त झोप लागल्यासारखे वाटते.

 

रात्री उशिरा जेवण करायची गरज पडल्यास खूप कमी खावे , हलके आणि सुपाच्य भोजन घ्यावे. शरीरात कफ दोष वाढल्यामुळे प्रामुख्याने सर्दी, खोकला, दमा पचनक्रिया मंदावणे,वजन वाढणे आणि मधुमेह यासारखे आजार होतात. ही महत्वपूर्ण पोस्ट आपल्या ओळखीतील मित्र मैत्रिणी असतील त्यांना पाठवा प्लीज

 

संदर्भ गुगल

 

शुभम भवतू

 

विलास कुलकर्णी

( आप्पा महाराज )

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा