You are currently viewing माझा मराठीचा बोलू कौतुके

माझा मराठीचा बोलू कौतुके

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझा मराठीचा बोलू कौतुके* 

 

मराठी खरंच मराठी आहे का?

 

आपल्या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे.तेव्हा आपली भाषा टिकवायची जबाबदारी ही तितकीच वाढली आहे.बोलण्यात येणारे इ़ग्रजी शब्दाबद्दल. मी सांगणार आहे.

मराठी भाषा संस्कृत मधून आली व समृध्द आहे,हे अनेकांनी वेगवेगळे शब्द वापरून सिध्द केलेलं आहे.आपणही आधी मराठी तच बोलायचो पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या,गावं जाऊन नगरे महानगरे झाली,घरं हरवून सोसायटीच्या सदनिका आल्या… अर्थात परिस्थिती,नोकरी, व्यवसाय यातील बदलांमुळेच.मग शब्दही तसेच इंग्रजी..बैठकीचा हाॅल,स्वैंपाकघत किचन, गच्चीचा टेरेस ,खोल्या जाऊन वन,टू,थ्री रूम आल्या.अजून‌देवघराला मात्र देवघर शब्द तेवढा ऐकायला येतो.

हातपाय धुवून म्हणत नाही कोणी,वाऍश घेऊन फ्रेश होते तोंडी झालंय.

मुलांनातर तीच भाषा, दप्तर गेलं स्कूलबॅग ,वाटरबाॅटल,डबाऐवजी टिफीन. हे बदल होऊनही बरीच वर्षे झाली.पिशवी तीच‌‌,शाॅपरबॅग.‌.झाली.नाईट ड्रेस ,गाऊन.‌..पंखा, खुर्ची,पुष्प गुच्छ, किती किती शब्द नकळतपणे आपल्या मराठी त असतां ही आपण इंग्रजीतून घेतो. पहाट ते रात्र एकदा विचार. करून खरंच आठवून बघा..‌..

मग लक्षात येतं की आपणच आपल्या मराठी पासून खूप दूर गेलो आहे.आपल्या भाषेचा वापर करण्यात आपल्याला अभिमान वाटायला हवा.शब्द भाषा तेव्हा च टिकतील जेव्हा ते लेखनात ,बोलण्यात सहज वापरले,उच्चारले जातील.

आईबाबा शब्द ही आपण हद्दपार केले आहे.कधी कधी वाईटही वाटतं.मराठी आपली भाषा आहे तिचा आदर, सन्मान आपण सगळ्यांनी बाळगायला हवा.व मरीठीला उच्च स्थान द्यायला हवे.

कृती केली तरच हे शक्य होईल.

मराठी टिकवणे वृध्दिंगत करणे सर्वस्वी आपल्या हातीच आहे.

———————————–

अरुणा दुद्दलवार,दिग्रस यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा