न्हावेलीतील दोन बंधाऱ्यांना फळ्या टाकून पाणी अडविले
दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; भूजल पातळी वाढविण्यासाठी उपक्रम
न्हावेली :
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी अडविणे, पाण्याची साठवण करणे तसेच भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातील भटाचेटेंब बंधारा तसेच चौकेकरवाडी-आवळेभोम बंधारा या दोन्ही बंधाऱ्यांना फळ्या टाकून पाणी अडविण्याचे काम करण्यात आले.
हे काम सुरू असताना सावंतवाडी तालुक्याच्या सभापती जाधव मॅडम तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ) जाधव साहेब यांनी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. यावेळी मा. सरपंच श्री. अष्टविनायक धाऊसकर तसेच ग्रामपंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री. शरदजी धाऊसकर यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण करण्यात आले.
पाणी अडविण्याच्या या उपक्रमामुळे आगामी काळात पाण्याची उपलब्धता वाढण्यास तसेच परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
