दुष्काळी भातशेतीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन
_पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार समाजकल्याण सभापती रुहिता तांबे,पंचायत समिती सदस्य संजना राणे यांच्यासह अधिकाऱ्यांची तरंदळे पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना_
कणकवली :
यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे मॅडम,कणकवली पंचायत समिती सदस्य संजना राणे मॅडम, तरंदळे सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत,डॉ.सत्यवान राणे,ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा माळकर,कृषी सेविका सोनिया चव्हाण यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तरंदळे गावातील भातशेतीची पाहणी केली.
यावेळी अपुऱ्या पावसामुळे करपून गेलेल्या भातपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते, शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या.
