You are currently viewing राजस्थानी मिरची वडा

राजस्थानी मिरची वडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम पाककृती*

 

*राजस्थानी मिरची वडा*

 

साहित्य-: उकडलेला बटाटा,मिरची भजीची जाड मिरची, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला,बडीशोप पावडर, हिंग, हि मिरची पेस्ट, कोथिंबीर,तेल, बेसनपीठं, सोडा, तिखट,

 

कृती-: बटाटा स्मॅश करून त्यात धने जिरे व बडीशोप पावडर घालणे.नंतर हिंग, चाट मसाला, मीठ, कोथिंबीर हि मिरची पेस्ट थोडे तिखट घालून मिक्स करून ठेवणे.नंतर मिरची घेऊन त्याला एका साईडने काप देऊन आतील सगळ्या बिया काढून टाकावे.नंतर त्यात वरील बटाट्याचे मिश्रण नीट भरून ठेवणे.एका भांड्यात बेसनपीठ, मीठ, सोडा, कोथिंबीर, थोडे तिखट, हिंग घालून पाणी घालून बटाटा वड्यासारखे पीठ भिजवून त्यात ही भरलेली मिरची तेलात छान तळुन घ्यावी.झाला मस्त मिरची वडा तय्यार. साॅस सोबत हा मिरची वडा छान लागतो.

 

*सौ. संध्या कुलकर्णी…सातारा.*

प्रतिक्रिया व्यक्त करा