ईश्वरपूर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
उरूण ईश्वरपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धेत (सांघिक) इनरव्हील ग्रुप ऑफ ईश्वरपूरने प्रथम क्रमांक पटकाविला. जय सद्गुरू ग्रुपने द्वितीय, तर रणरागिणी ग्रुपने तृतीय क्रमांक मिळविला. नवतारका ग्रुप व साई गणेश ग्रुपने उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना तसेच व्यक्तिगत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
आ. जयंतराव पाटील म्हणाले, गौराईच्या खेळातून महिलांना व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळत आहे. महिलांसाठी नव-नवीन स्पर्धांचे आयोजन करणे आणि महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे.”
‘घागर घुमविणे’ या प्रकारात वर्षा फाटक यांनी प्रथम, कल्पना कदम यांनी द्वितीय, तर अनिता गोंदकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. ‘सुप नाचविणे’ प्रकारात कल्पना दाभोळे यांनी प्रथम, सुहासिनी जंगम यांनी द्वितीय, तर छाया जगताप यांनी तृतीय क्रमांक मिळविला. ‘काटवटकणा’ प्रकारात हर्षदा पाटील यांनी प्रथम, संध्या वीर यांनी द्वितीय, तर वैशाली भांबुरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
सौ. रेणुका पांगम (सांगली) व पद्मावती गरग (मिरज) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
याप्रसंगी उपस्थित महिलांमधून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यामध्ये देवयानी पिसे, सुवर्णा यमगर, प्रीती शिंगटे, सत्वशीला माने, वैशाली भांबुरे, आक्काताई गावडे, दिपाली कांबळे, तनिष्का परीट, शुभांगी जाधव आणि शैलजा कुकडे या भाग्यवान ठरल्या. त्यांना ‘मानाची पैठणी’ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी सौ. मंगल आनंदराव मलगुंडे यांच्या हस्ते आणि प्रा. शामराव पाटील, गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पुष्पलता खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी आभार मानले. शिवानी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उरूण ईश्वरपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
यावेळी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, शंकरराव चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी कमल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका शहा, स्वराज्य फाउंडेशनच्या संगीता शहा, नगरसेविका शुभांगी शेळके, मनीषा कुरळपकर, रेखा जाधव, पल्लवी नागे, सभापती संदीप माने, नगरसेवक सुनील मलगुंडे, युवकाध्यक्ष दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अभिजीत कुर्लेकर, सोशल मीडिया अध्यक्ष अभिमन्यू क्षिरसागर तसेच नगरसेवक, महिला पदाधिकारी व शहरातील महिला उपस्थित होत्या.
