You are currently viewing हाशिमरा आणि कलाईकोंडा

हाशिमरा आणि कलाईकोंडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

(भाग-४) 

*हाशिमरा आणि कलाईकोंडा*

 

 

*हाशिमरा* ला TD म्हणजे मुक्काम *जयगावला*, *आराम लॉज*.

आणि *कलाई कोंडा* म्हंटलं की मुक्काम *खरगपूर, अलंकार लॉज*.

 

ह्या लॉजचा मालक *गुप्ता*.एकदम मस्त माणूस.त्यानं तर लॉजच्या रिसेप्शन हॉलला नाव दिलं होतं *”नासिक हॉल”*.

 

अफलातून माणूस,स्थानिक पातळीवर प्रचंड दरारा आणि ओळखी असलेला.

एकदा तर,ट्रान्सपोर्ट व्हेईकलला अपघात झाला होता आणि आमचे काही सहकारी स्थानिक इस्पितळात ऍडमिट झाले होते.प्रचंड गर्दी होती त्या इस्पितळात यास्तव बेड कुणालाच मिळाले नव्हते.,सर्व जण खाली जमिनीवर.

पण,गुप्ताजी आस्थेने तिथं पहायला आले अन लगोलग सर्व जणांना बेड मिळाले.

 

*जयगावचं, आराम लॉज.*

ह्या लॉजचंही वैशिष्ट्य होतं(होतंच म्हणावं लागेल, कारण शेवटच्या वेळी गेलो होतो तेंव्हा दुसऱ्या ठिकाणी राहिलो होतो, उत्सुकता म्हणून तिथं जाऊन आलो आणि प्रश्न पडला काय इथं रहात होतो आपण?)ह्या लॉजच्या गच्चीवर *बोन्साय ट्रीज* होते.*आंब्याचं बोन्साय*.

 

*हाशिमरा* ला TD म्हणजे,*ब्लॅक माऊंटन* आलंच ओघाने.केवळ ऐंशी रुपयांत फुल साईज व्हिस्की.

कुठेही सहज उपलब्ध.ठिकठिकाणी सरकारी दारु दुकाने.

एका रविवारी *धौती खोल* नदीवर आंघोळीला जातांना काही ही प्लॅनिंग नसतांना ते वाटेवरील दुकान दिसले म्हणून खरेदी झाली.

पूर्वनियोजित काही नसल्यान झाली ना पंचाईत.

नो ग्लास नथींग विथ अस.

नो प्रॉब्लेम, झाकण म्हणजे पेग मेजर ,

तोंड म्हणजे ग्लास

पाणी तर खालून वहातच होतं.

 

संध्याकाळी फिरत फिरत देशाटन म्हणजे काय तर *भुतान* ला जाऊन यायचे अगदी दररोज.

केवळ त्या कम्पाउंडच्या अलीकडे आणि पलीकडे दोन भिन्न संस्कृती.

थिएटर, मार्केट, व्हिडीओ हॉल सर्रास मदिरापान, स्त्री पुरुष,सानथोर भेदाभेद नाही.

*बौद्ध मंदिरा* त जायचं आत्ता नको प्यायला,किंवा सिनेमाच्या मध्यंतरात नको असं काsssही नाही.

ही तेथील स्थानिकांची मनोधारणा.

 

*भूतान* साईडला तर बारच्या गल्ल्यावर पैसे घेणाऱ्या आणि सर्व्हिस देणाऱ्या सुद्धा बायकाच.

 

*जयगावला एक शिवा हॉटेल* होतं.चिकन /फिश एकदम स्वस्त.(सकाळ संध्याकाळ तिथलं हादडल्याने उष्णता वाढली होती पण खायचं नाही थांबवलं)

त्याच हॉटेलांत वरच्या मजल्यावर काही खोल्या तिथे *भूतान* मार्गे तस्करी करणाऱ्या सुंदर एकल भूतानी बायका बिनधास्तपणे रात्री मुक्कामी असायच्या,त्यांना *कुरियर* म्हणायचे.

 

इथंच चहाचे मळे आहेत.

चहाचं उत्पादन, प्रतवारी कशी करतात पहायला मिळाली,आणि अनेक गैरसमज निमाले.

त्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या वस्त्या तिथेच.

सुरुवातीलाच एक केबिन तिथं त्यांचा एक्सपर्ट निरनिराळ्या पॉट मध्ये विशिष्ट टेंप्रेचरलाचहा उकळून उकळून चव जिभेवर ठेवून घ्यायचाआणि प्रतवारी ठरवायचा.त्या चहात साखर, दूध बिलकुल नसायचं.असा हा चहा पिऊन पिऊन त्याची जीभ काळी पडलेली, भूख संपलेली.तो मात्र हायली पेड बरे ! ही इज नेक्स्ट टू ओनर !

 

आपल्या पर्यत येणारी चहापत्ती मात्र कलकत्ता मार्गे येते कारण तिथे त्यात फ्लेवर आणि कलर ऍड करतात म्हणे !

 

(ही सर्व माहिती तिथे मिळालेली/पाहिलेली आहे,चुकभुल देणेघेणे)

 

*पान खाणे* इथली एक मस्ट संस्कृती.

पान म्हणजे काय तर, एका मोठ्या पानावर चुना फासून तीवर ओली सुपारी अर्धी ठेवायची आणि मग तो विडा (?) तोंडात ठेवायचा.त्याच पानांचे तोडलेल्या देठा वर चुना घ्यायचा आणि पान चावता चावता तो चुना जिभेवर सारखं लावत रहायचं.

आमच्यातले अट्टल तंबाखू खाणाऱ्यांनी सांगितले की किक बसते मस्त म्हणे!

मी काय ते टेस्ट केले नाही, कारण आम्ही *तंबाखू ओढणारे तंबाखू चघळणाऱ्यांच्या* पंक्तीतले नव्हे.

 

—-राजा जोशी

9823687519

 

〰️〰️〰️〰️〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा