You are currently viewing पितृमोक्ष अमावस्या

पितृमोक्ष अमावस्या

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम सहाक्षरी काव्यरचना*

 

  *पितृमोक्ष अमावस्या*

 

 

पितरांचे महत्त्व

आज जाणायचे

ऋणातून त्यांच्या

मुक्त व्हावयाचे।।

 

पूर्वज स्मरण

मिळे गोड फळ

सेवेमुळे त्यांच्या

जीवन सुफळ।।

 

पालक दैवत

करा नित्य सेवा

जीवनात देती

संस्कारांचा मेवा।।

 

वृद्धत्वात सेवा

व्हावी त्यांची काठी

आधारवड तो उभा सदा पाठी।।

 

ठेवा स्मरणात

चिंतन करावे

अन्न वस्त्र दान

वंचितास द्यावे।।

 

पितृगण तृप्त

मिळे समाधान

वंदन तयांना

देती वरदान!!

 

🙏🌹🌹🙏🌹🌹🙏

अरुणा दुद्दलवार..✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा