प्राधिकरण निगडी – दिनांक २३ सप्टेंबर रोजी प्राधिकरण येथील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले.
अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पदपथावरील अतिक्रमणे हटविणे, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव,रस्त्याच्या दुतर्फा होणारे वाहनांचे बेशिस्त पार्किंग, भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांना पकडून नेणे. खड्डे मुक्त प्राधिकरण रस्ते असावेत, प्राधिकरण विभागातील आवश्यक त्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, सर्व उद्यानामधील योग्य देखरेखी अभावी झालेली दुरावस्था, उद्यानांमधील, ढिसाळ सुरक्षाव्यवस्था असल्याने तेथे अनेक गैरप्रकार सुरू असतात.
हरित सेतूच्या नावाखाली झालेल्या पदपथांची अवास्तव रूंदी कमी करणे, पादचाऱ्यांना चालण्यासाठी, एक मीटर रूंदीचा पदपथ पुरेसा आहे.
वरील सर्व मुद्दे निवेदन देऊन बैठकीत विस्ताराने मांडले आणि त्यावर चर्चा झाली.
आयुक्तांनी, काही अधिकाऱ्यांशी बोलून, या सर्व समस्या सोडवण्यासाठी सूचना दिल्या.
तसेच, “अ” प्रभाग अधिकाऱ्यांना सुध्दा एक निवेदन देऊन चर्चा करावी, असे सुचवले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष या. चंद्रशेखर जोशी, माजी महापौर , तसेच सर्वश्री, आर एस कुमार, सुर्यकांत मुथियान, शामसुंदर परदेशी, गुणवंत चिखलीकर, शरद यन्नुवार चर्चेत सहभागी झाले.
