You are currently viewing तामिळनाडूचे मा. मुख्य सचिव शनिवारी अमरावतीत
Oplus_16908288

तामिळनाडूचे मा. मुख्य सचिव शनिवारी अमरावतीत

अमरावती :

तामिळनाडूचे मुख्य सचिव व विदर्भाचे सुपुत्र तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्री विश्वनाथ शेगावकर हे शनिवार दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती शहरात येत आहेत. अमरावती व बडनेरा शहरातील विविध संस्थांना व मान्यवर व्यक्तींना ते भेटी देणार असून दुपारी तीन वाजता स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तीन वाजता चा हा कार्यक्रम श्री संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी बचत भवनच्या समोर कलेक्टर ऑफिस ते आरटीओ रोड येथे असलेल्या अभ्यासिकेमध्ये व ग्रंथालयामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रशासकीय सेवेत राज्य सरकारच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

श्री विश्वनाथ शेगावकर हे मूळचे विदर्भातील अकोला येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण अकोला येथे झालेले आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र शासनामध्ये सहाय्यक निबंधक ते उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत कार्यरत होते. त्यानंतर आयएएस झाल्यानंतर ते तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले .त्यानंतर तामिळनाडूमध्ये कोईमतुर येथे आयुक्त म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर तामिळनाडू सरकारच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभागात सचिव म्हणून त्यांनी काम केले असून तामिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत.

श्री विश्वनाथ शेगावकर यांना प्रशासकीय सेवेबरोबर लेखनाची देखील आवड असून त्यांचे मॅरेथॉन हे आत्मचरित्र खूप गाजलेले आहे .याशिवाय त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये भरपूर लेखन केलेले आहे. अमरावतीच्या मिशन आयएएसने व अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे नियोजन सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे चिंतामण खोब्रागडे व अभ्यासिकेचे व ग्रंथालयाचे सूत्रधार श्री चौधरी यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा