*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”गणपती सण आनंदा उधाण”*
गणपती मतिप्रकाशु होत सत्वर प्रसन्न
विश्वातील चिंता दुःख दूर करी दारिद्र्यIIधृII
पार्वतीने तप केल्याने शंकर झाले प्रसन्न
शिवलिंगावर पत्री पुष्प उमाने केले अर्पण
हरितालिका व्रताने उमाला शिव झाले प्राप्तII1II
शिव पार्वती मातेला महिला करिती वंदन
स्त्रिया करिती हरतालिका पूजन मनानं
संसार सुखी व्हावा म्हणून नारी करिती व्रतII2II
पादुका रेखाटून विघ्नहर्ताचे होते आगमन
गणराया होत विराजमान भक्तांचे घरांत
चैतन्योत्सवाचा जल्लोष होत घराघरांतII3II
चतुर्भुज शूर्पकर्ण सर्वत्र पाही सूक्ष्मदृष्टीनं
लंबोदर सर्वांचे अपराध घेई उदरांत
पार्थिव गणेश मूर्त सगुण सुंदर दर्शनII4II
एकदंत राहे कमरेला सर्प बांधून
शंख अंकुश पद्म मोदक चार हातांत
मूषक वाहन समतोलत एकत्र नांदतII5II
सजावट दुर्वा हार फुले पूजा चाले सर्वत्र
अथर्वशीर्ष पठण दाविती मोदक नैवेद्य
गणपती सण मोठा आनंदाला येत उधाणII6II
गणेशोत्सव साजरा होत देशोदेशी विश्वांत
आनंदास पूर बाप्पा करी बुद्धी कला प्रदान
ज्ञानदेवादि संत देव प्रारंभी करती वंदनII7II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
