You are currently viewing कृषी खात्याचे पंख छाटले -शेतकऱ्यांना अपंग केले – श्री विलास सावंत

कृषी खात्याचे पंख छाटले -शेतकऱ्यांना अपंग केले – श्री विलास सावंत

कृषी खात्याचे पंख छाटले – शेतकऱ्यांना अपंग केले . . . .श्री विलास सावंत . . . .

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील साधारण 60 टक्के सामान्य जीवन जगणारे शेतकरी सोईपुरते अन्नदाते म्हणून संबोधले जातात त्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कार्यरत असणारे आणि शेतकऱ्यांना भरभरून देणारे एकमेव खाते म्हणजे कृषी खात होय .कृषी खात्याला शेतकऱ्यांना फक्त देणं आणि देणंच आहे मग ते त्यांचा आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी असणाऱ्या अनेक प्रकारच्या योजना असतील -अनेक प्रकारची वादळे -अतिवृष्टी -गारपीट -दुष्काळ -लहरी वातावरणामुळे होणाऱ्या फळ पीक नुकसान या सर्वांचा पंचनामा करून त्यावर उपाय काढून शेतकऱ्यांना योग्य मदत निधीच्या सहाय्याने करणे -गलित गात्र झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारे शेतकऱ्याला अनेक प्रकारे मदत देणार एकमेव खात म्हणजे कृषी खात होय .इतर खाती ही फक्त घेणारी आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांना देणंच आहे .अशा शेतकऱ्यांना वरदान असणाऱ्या कृषी खात्याला नवीन आकृतीबंधात अडकवून त्या खात्याचे पंख छाटण्यात आले आहेत .38 हजार ते 40 हजार कृषी सहाय्यक महाराष्ट्राला आवश्यक असताना फक्त 23 476 पदे मंजूर करण्यात आली आहेत .मुळात असणाऱ्या 28 566 पदांपैकी 7758 पदे निरसित ( कमी करून )नव्याने 2668 पदे निर्माण करण्यात आली .परंतु मुळात 5O90 पदे कमी करून शेतकऱ्यांना अपंग करण्यात आले आहे .तीन चार किलोमीटर चालत जाऊन शेती बांधावर पीक पाहणी करून त्यांना मार्गदर्शन करणारे व शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविणारे शेतकऱ्यांचे देवदूत असणाऱ्याना कमी करून ऑफिसमध्ये बसून कारकुनी करणाऱ्यांची संख्या या आकृतीबंधात वाढविले हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे .खरंतर शेतात जाऊन हे कृषी सहाय्यक स्वतःचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात देत असत . परंतु कृषी सहाय्यकांची संख्या कमी करून ऑफिस कारकुनी वाढविल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे .नवीन आकृती बंधात जरी जुना 1500 खातेदारांमागे एक कृषी सहाय्यक अधिकारी नेमला असला तरी कोकणातील अनेक एक खात्यामध्ये किमान आठ ते दहा व्यक्ती असतात त्यामुळे कृषी सहाय्यकांवर प्रचंड ताण पडणार आहे .आणि जवळचे गाव तरी त्यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असले तरीही भौगोलिक रचनेमुळे दुसऱ्या गावात जायला किमान आठ ते दहा किलोमीटरच्या अंतराने जावं लागणार आहे त्यामुळे वेळेचाही अपव्यय होणार आहे . . . . .महाराष्ट्रात ग्रामसेवकांची संख्या 22388 तर तलाठ्यांची संख्या 15755 त्या कृषी प्रधान महाराष्ट्रात सहाय्यक कृषी अधिकारी फक्त 11445 आहेत ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे .तर संपूर्ण जगाला काजू आंबा कोकम अशा जीआय मानांकित फळे प्रदान करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोकांतिका फारच वेगळी आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ व लोकसंख्या असणाऱ्या सावंतवाडी तालुक्याला फक्त 28 कृषी सहाय्यक व 4 उपकृषी अधिकारी तर काजू नारळ सुपारी व पर्यटन इत्यादी मध्ये प्रगती करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यामध्ये फक्त ७ कृषी सहाय्यक व एक उप कृषी अधिकारी समायोजन करण्यात आले आहेत व सर्वात छोट्या वेंगुर्ला तालुक्याला 28 कृषी सहाय्यक व 6 उप कृषी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत . . . .कृषी खाते सोडून इतर सर्व खाती ही शेतकऱ्यांकडून घेण्याचच काम करत असते मग ते महसूल खात असो इलेक्ट्रिक खात असो परिवहन असो इन्कम टॅक्स असो मात्र शेतकऱ्यांना भरभरून देणाऱ्या कृषी खात्याला या नवीन आकृतीबंधामुळे अपंग करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचे काम शासन करत आहे .यामध्ये आणखी एक खोच शासनाने मारली असून कृषी विभागातील कार्यालयीन स्तर कमी करणे या अंतर्गत मंडल कृषी अधिकारी सुमारे 885 व उपविभागीय कृषी अधिकारी 90 कार्यालय आकृतीबंध फेर रचने अंतर्गत बंद करण्यात येत आहेत .त्यामुळे सर्व सामान्य गरीब शेतकऱ्यांना आपल्या छोट्या मोठ्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे .त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक व वेळेचा अपव्य होणार आहे .मंडल कृषी अधिकारी कार्यालय चालू राहणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे होते परंतु तीही बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे तरीही या आकृती बंध फेर रचनेचा शासनाने पुन्हा विचार करावा अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी केली आहे .या गणेशोत्सव मंगल कार्यकाळात श्री गणरायाने शासनाला सुबुद्धी द्यावी अस साकडं शेतकरी फळ बागायतदार संघातर्फे श्री गणरायाला करण्यात आल आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा