You are currently viewing माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसह आरोंदा येथील निवासस्थानी गणरायाचे घेतले दर्शन

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसह आरोंदा येथील निवासस्थानी गणरायाचे घेतले दर्शन

सावंतवाडी/ आरोंदा : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसह आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.

यावेळी सौ. स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, श्री. सतीश नाईक व कुटुंबीय, श्री. सुशांत नाईक व कुटुंबीय, श्री. संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासह संपूर्ण नाईक परिवार उपस्थित होता. सर्वांनी भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले.

यावेळी नाईक कुटुंबीयांनी सर्व गणेशभक्तांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाधान लाभावे, तसेच सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर व्हावीत, यासाठी श्री गणरायाकडे प्रार्थना केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा