You are currently viewing शब्दगंध च्या वतीने ‘घालमेल’ वर शनिवारी चर्चासत्र

शब्दगंध च्या वतीने ‘घालमेल’ वर शनिवारी चर्चासत्र

अहिल्यानगर / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे लिखित ‘घालमेल’ या पुस्तकावर शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर, सावेडी, अहिल्यानगर येथे चर्चासत्र होणार आहे. अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.किशोर धनवटे (नेवासा) राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास दौंड, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अहिल्यानगरचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, प्रा.आशा पालवे (पाथर्डी) सहभागी होणार आहेत. ‘घालमेल’ या पुस्तकातील आशय, सामाजिक वास्तव, मानवी भावविश्व आणि साहित्यिक मूल्ये यावर या चर्चासत्रात सखोल विचारमंथन होणार आहे. वाचक आणि साहित्यप्रेमींना पुस्तकाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. तसेच यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी साहित्यप्रेमी, लेखक, कवी, वाचक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदच्या वतीने संस्थापक सचिव सुनील गोसावी, राजेंद्र पवार, मकरंद घोडके, प्रा.डॉ.अशोक कानडे, शर्मिला गोसावी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा