*ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य सहसचिव लेखिका कवयित्री अनिसा सिकंदर लिखित वास्तववादी काव्यरचना*
*साखरेचे भाव गगनाला भिडले*
साखरेचे भाव गगनाला भिडले,
घरचे सारे बजेटच बिघडले!
चहात साखर किती घालू रे भाऊ?
भाव ऐकून कपाळावर आठ्या नको आणू!
गोडव्याचे दिवस कुठे रे सरले?
साखरेचे भाव गगनाला भिडले!
काल चमचे भरून साखर पडायची,
चहाची चव मनाला सुखवायची;
आता चहाच्या कपात दाणे मोजले,
साखरेचे भाव गगनाला भिडले!
लाडू म्हणती, “आम्ही कुठे उरले?”
जिलेबीचे वळणही जरा विरले;
शिरा म्हणतो, “काय माझे झाले?”
साखरेचे भाव गगनाला भिडले!
पाहुणा आला, म्हणे, “चहा गोड करा!”
गृहिणी म्हणे, “शुगर वाढेल, गोड कमी करा!”
साखरेचे दाणे कपाटात उरले,
गोड बोलण्याचे दिवसही अता सरले?
अनिसा सिकंदर, दौंड
९२७००५५६६६
