You are currently viewing आदित्य पूजन

आदित्य पूजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”आदित्य पूजन”* 

 

 

सूर्यनारायण येतो तेज किरण घेऊन

येतो चौखूर अश्वरथांत रंग उधळीत IIधृII

 

अंधारातून उजेडाकडे नेतो आत्मविश्वासानं

पृथ्वीवर उगवे सर्वा करितो मार्गदर्शन

सृष्टीला करीतो सक्रिय जागृत चैतन्यII1II

 

कार्य करण्या वाटे उत्साह ऊर्जा मुक्त मनानं

पशु पक्षी वृक्ष नद्या नाले आनंदी समुद्र

सोन किरणे घेण्या आतुर सर्व मुक्त पणानं II2II

 

सर्वांचा जीवनक्रम नित्य करी सुरुवात

सर्वांना करितो उद्योगशील कार्यरत

कला साहित्य संगीत गायना देतो उत्तेजनII3II

 

सूर्योदय मध्यान अस्त जीवनक्रम नित्य

वाटे प्रकाश चैतन्य अखंड चिरतरुण

देतो पर्जन्य जीवसृष्टी निष्काम चिरंतनII4II

 

अंतराळ जनक स्वयंप्रकाशी नियंत्रक

तारे ग्रहांना करी उत्तेजित प्रकाशमान

पंचमहाभूत नियंत्रक राखी पर्यावरणII5II

 

जन्मापासून मोठा तरुण आहे कर्तुत्ववान

आरोग्य शक्तीवर्धक आहे अनादी अनंत

आदित्यास पूजुया देऊ अर्घ्य मानूया ऋणII6II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा