*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंगात रंगूनी जातो…*
देतो हा किती मोज ना मिती रंगात रंगूनी जातो
हिरवळीवरी दंव पडे जसे हा मातीत एकरूप होतो..
आडमाप फुले हे गवत डुले हा इंद्रधनू खुलवितो
हा बनून मयुर फुलवितो पंख हा लक्षदीप की होतो…
किनखाप जणू सोनेरी हिरवी पैठणी नेसूनी येतो
जरतार किती किनारी हा किरणशलाका होतो..
गवतात किती टणटणी नाजुक सुमने विहरती
मधमाशा भुंगे फुलपाखरू गुणगुणत जणू ते गाती..
बदकाची माळ ती उडे म्होरक्या मार्ग आक्रमितो
झुले झुलती वृक्षाच्याउरी पक्षी कुणी झुलवितो
राऊळी चिपळ्या वाजती पखवाज बोलती होऊनी
दंग
नाचती भक्त तल्लीन नाचतो जणू श्रीरंग..
वर्णावा कितीहा महिमा अरे श्रावणा पतितपावना
महिन्यात शोभतो मणी किती तू गुणी मनभावना..
सणवार किती घेऊनी देतसे मनी किती तो मोद
पोथीनिपुराणे चालती शुद्ध ती मती मनी ना खेद..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
