*शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आचरा येथे नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न*
*माजी आमदार,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती*
मालवण
दरवर्षीं प्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे नारळ लढविणे स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पुरुष आणि महिलांसाठी हि स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेला कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना पैठणी,रोख रक्कम तसेच आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक जिजा टेमकर,उप तालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,आचरा शहर प्रमुख माणिक राणे, मच्छिमार नेते नारायण कुबल, नाटळ विभागप्रमुख गुरु पेडणेकर, युवासेनेचे तेजस राणे श्रीकांत बागवे,जगदीश पांगे, दिनेश साळकर, नितीन घाडी, राधिका मोंडकर, शिल्पा रेडकर, रूपा कुडाळकर, गौरी सावंत, सोनाली खोबरेकर, पूर्वा तारी, श्याम घाडी, परेश तारी, रुपम टेमकर, आबा सावंत, पळसंब उपसरपंच अविराज परब, राजू घाडी, अनिल महाजन, चंदन पांगे, मयूर करंगुटकर, हर्षद पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.
