*वैभववाडी महाविद्यालयाची आचिर्णे येथे अभ्यास सहल संपन्न*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील
पर्यावरण व्यवस्थापन या विषयांतर्गत एक दिवशीय अभ्यास सहल आचिर्णे येथे
आयोजन करण्यात आली होती.
वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथील गवताळी पठार व कातळशिल्प येथे आयोजित केली होती. सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व व जैवविविधता याबाबत डॉ. विजय पैठणे, डॉ. आर. एम. गुलदे व प्रा. डी. एस. बेटकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये महाविद्यालयातील
कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी तसेच आचिर्णे येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी
तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांची विशेष उपस्थिती होती. पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या पठाराला राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील तज्ञ व्यक्तींनी यापूर्वी भेटी दिलेल्या आहेत. प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
