You are currently viewing मोकाट भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

मोकाट भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

मोकाट भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

फोंडाघाट :

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. त्याच धर्तीवर आता फोंडाघाट परिसरातील वाढत्या मोकाट भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडेही ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फोंडाघाटमधील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे कळप वाढताना दिसत असून, त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागल्याने अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.
मोकाट जनावरांच्या समस्येवर ग्रामपंचायतीने ज्याप्रमाणे पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही कायदेशीर, सुरक्षित आणि मानवीय पद्धतीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून या समस्येवर नियंत्रण मिळवावे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ग्रामपंचायतीने संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मोकाट जनावरांप्रमाणेच मोकाट भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा फोंडाघाट ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा