You are currently viewing इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना ओबीसी समाजाच्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार* –  श्री उदयसिंह गायकवाड. सहाय्यक संचालक

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना ओबीसी समाजाच्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार* –  श्री उदयसिंह गायकवाड. सहाय्यक संचालक

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना ओबीसी समाजाच्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार –  श्री उदयसिंह गायकवाड. सहाय्यक संचालक

सिंधुदुर्ग

*इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत आज दिनांक 19/ 8/ 2026 रोजी इतर मागास बहुजन कल्याण या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेगवेगळ्या प्रवर्गासाठी काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांच्यासाठी सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये माहिती शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष मा. नितीन वाळके व हेमंत उर्फ काका कुडाळकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद व समन्वयक समता परिषद व श्री सुनील भोगटे राज्य समन्वयक ओबीसी महासंघ आणि सर्व ओबीसी समाजाचे जिल्हाअध्यक्ष व पदाधिकारी तसेच श्री उदयसिंह गायकवाड सहाय्यक संचालक श्री स्वप्निल कांबळे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग तसेच इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच गणेश हुकीरे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सिंधुदुर्ग .श्रीमती प्रीती पटेल जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे महामंडळ. श्रीमती वर्षा कासले महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ. सुरज बागवे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ उपस्थित होते*.
*सदर शिबिरामध्ये शासनाच्या सर्व योजनांची माहिती संबंधित पदाधिकारी यांना देण्यात आली. यावेळी श्री नितीन वाळके यांनी या योजनांचा सर्व समाजातील घटकांनी अभ्यास करून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तर काका कुडाळकर म्हणाले आज शासन ओबीसी समाजातील समाज घटकांना त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी विविध योजनांचा लाभ देत आहे. यात विशेष करून विद्यार्थ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु आज जिल्ह्यात तीस हजार पेक्षा जास्त ओबीसी विद्यार्थी संख्या असताना फक्त साडेसात हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती चा लाभ घेत आहेत. यासाठी सर्वांनी शालेय स्तरावर जागृती दाखवली पाहिजे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व वसतिगृहाचा लाभ मिळाला नाही तर आधार योजनेचा लाभ घेतला पाहिजे. शासन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या शिष्यवृत्तीचा लाभ देत असते. आपला जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असल्यामुळे याचाही लाभ आपण घेतला पाहिजे. ओबीसीच्या 14 विविध महामंडळ अस्तित्वात असली तरी कर्ज योजनेचा लाभ ओबीसी म्हणून सर्वांना समान मिळतो. त्याचाही विचार नवीन व्यावसायिक व उद्योजकांनी केला पाहिजे. श्री गायकवाड यांच्यासारखा चांगला अधिकारी लाभल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या बांधवांना सक्षम करण्यात सक्षम करण्यासाठी या कार्यालयाचा पुरेपूर वापर केला पाहिजे*
*यावेळी सुनील भोगटे, श्री संदीप कदम यांनी आपले विचार मांडले. तर सर्व उपस्थित अधिकारी यांनी आपापल्या भागातील आपापल्या विभागातील योजनांची सविस्तर माहिती प्रस्तुत केली. यावेळी श्री बाळा कन्याळकर, श्री संदीप कदम, श्री सुनील पाटकर, श्री संदीप चव्हाण, श्री सुहास मोचेमणकर ,श्री तुकाराम तेली, श्री साईनाथ आंबेडकर, श्री लक्ष्मण तेली, सौ अमिदी मेस्त्री आणि बहुसंख्येने जिल्ह्यातील ओबीसी समाजातील जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित समग्र वांग्मय पुस्तक उपस्थित सर्वांना भेट म्हणून देण्यात आली. भविष्यात तालुका तालुक्या ठिकाणी अशा प्रकारची शिबिर आयोजित करण्याचा मनोदय श्री गायकवाड साहेब यांनी व्यक्त केला*
==============
महोदय ,
*आपल्या दैनिकात/आपल्या चॅनलवर वरील बातमी प्रसिद्धी द्यावी ही विनंती*
काका कुडाळकर
समन्वयक समता परिषद सिंधुदुर्ग रत्नागिरी
माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा