*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*
सौदामिनी
लगागा/3 लगा
उभी राहिली एकदा अंगणी
मनी मूर्त रेंगाळली देखणी
असो ऊन काळोख वर्षा किती
सदा वाटली हासरी चांदणी
उन्हाला बसे केस सुकवावया
सुचेना करावी कशी बोलणी
तिची ओढ वाटे किती या मना
अहोरात्र डोळ्यापुढे हिरकणी
फुग्याच्याप्रमाणे उडे स्वप्न हे
तयाला न लागो कधी टाचणी
डॅा.शरयू शहा.
