You are currently viewing भाषण स्पर्धा

भाषण स्पर्धा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भाषण स्पर्धा* (बाल गझल)

 

फलकावरती मुलांस दिसते भाषण स्पर्धा

उत्साहाची लहर फिरवते भाषण स्पर्धा

 

विषय कोणता, वेळ कितीसा निवड कोणती

सहभागाला गर्दी करते भाषण स्पर्धा

 

लिहून देती मस्त भाषणे बाबा माझे

बाबांमागे टुमणे धरते भाषण स्पर्धा

 

पाठ करुनी सारे भाषण तयार होते

पाठांतरची सवय लावते भाषण स्पर्धा

 

प्रभावीपणे सादर व्हावे भाषण माझे

ग्रंथांना मग साद घालते भाषण स्पर्धा

 

कुणी दिलेली दाद कौतुकी त्या वेळेला

अजून मजला ती आठवते भाषण स्पर्धा

 

विचारशैली, सभाधीटता तयार होते

आयुष्याला पुरून उरते भाषण स्पर्धा

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा