You are currently viewing संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम
Oplus_16908288

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम

१८ ऑगस्टला वेंगुर्ल्यात विविध उपक्रमांचे आयोजन

वेंगुर्ला / प्रतिनिधी :

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी असून, त्यानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या १८ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून, तसेच उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र यांना पंखे वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वृक्षवाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

ही माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी दिली आहे. या सामाजिक उपक्रमांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा