You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

*वैभववाडी महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शासनमान्य
मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, पुराभिलेख संचालनालय मुंबई आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, २०२६ या कालावधीत १० दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत दररोज दोन तास तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी प्रवेश फी रू. ५०/- व प्रशिक्षण फी रू. २५० मिळून रू.३००/- तर इतरांसाठी प्रवेश फी रू.१०० व प्रशिक्षण फी रू.५०० मिळून रू.६००/- इतकी फी आहे. प्रवेश रद्द केल्यास फी परत मिळणार नाही. प्रशिक्षण वर्गातील ८०% उपस्थिती असणाऱ्या प्रशिक्षणार्थींची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये ५०% म्हणजे ५० गुण मिळविणा-या प्रशिक्षणार्थींना उत्तीर्ण घोषित करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र म्हणून शाळा/ महाविद्यालय ओळखपत्र व आधार कार्ड तसेच इतरांसाठी आधार कार्ड व प्रत्येकी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहे. या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच मोडी लिपी शिकण्याची इच्छा असलेली व्यक्ती सहभागी होऊ शकते.
प्रवेश मर्यादित असल्याने आपला प्रवेश लवकरात लवकर
निश्चित करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांनी केले आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या सविस्तर माहितीसाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा