*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका , समाजसेविका, कथाकार, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला श्रावण*
आला श्रावण श्रावण
घेऊनी सणांची बरसात
सोबतीला रिमझिम सरी
प्रसन्न झाला आसमंत
आला श्रावण श्रावण
नटली वसुंधरा
रंगबेरंगी फुलांचा
सुंगधीत सुटला वारा
आला श्रावण श्रावण
रान झालं हिरवेगार!
धरतीमाय चिंब भिजली
थंडगार सुटलं वार!
आला श्रावण श्रावण
आनंदाचं उधाण
उपवास, व्रत, वैकल्य
धार्मिक वातावरण
आला श्रावण श्रावण
राग, द्वेष,नका करु
प्रत्येकाच्या जीवनात
आनंदी आनंद भरु…!
अनुपमा जाधव
डहाणू
