You are currently viewing अमरावतीच्या महेश भवनात राज्यस्तरीय आरोग्य शिबीर

अमरावतीच्या महेश भवनात राज्यस्तरीय आरोग्य शिबीर

अमरावती – कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेणाऱ्या व कोणत्याही प्रकारचे औषध न देणाऱ्या तरीही सर्व प्रकारचे आजार दुरुस्त करणारी भारतामध्ये एक संस्था आहे तिचे नाव आहे आयएएसएस. या संस्थेमध्ये तुमच्या आहार प्रणालीमध्ये बदल करून निसर्ग उपचाराची साथ घेऊन तुमचे आजार विनामूल्य व कोणत्याही प्रकारचे औषध न देता दुरुस्त केले जातात. युट्युब वर आयएएसएस चे लाखो लोक अनुकरण करतात. या संस्थेचे प्रमुख व उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय मार्गदर्शक श्रीमती श्यामा दीदी शास्त्री यांचे तीन दिवसाचे आरोग्य शिबीर अमरावतीच्या बडनेरा रोडवरील महेश भवन येथे आयोजित करण्यात आले आहे . तसेच या शिबिरासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांची भोजन व निवास व्यवस्था निरोप संस्थेने महेश भवन येथे केली आहे.तसेच स्थानिक अमरावतीमधील नागरी रोज ये जा करून या शिबिरात सहभागी होऊ शकतात अशी माहिती अमरावतीच्या निरोग संस्थेचे पदाधिकारी प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे (9890967003) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर विजय कसा प्राप्त करावा यासाठी वेगवेगळ्या सुलभ युक्त्या सुचविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आदर्श भोजन पद्धती उपवास व इनिमा ध्यान झाडांच्या पानाचा रस भाज्यांचे सूप सलाड हर्बल काढा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

आय ए एस एस या संस्थेतर्फे 365 दिवस निरंतर भारतात ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केले जातात. विशेष म्हणजे यासाठी येणारे तज्ञ मार्गदर्शक कुठल्याही प्रकारचे मानधन प्रवास खर्च आकारत नाही. याशिवाय या शिबिरात विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येते. या शिबिरात सहभागी झाल्यास व शिबिरात सुचवलेले उपाय अमलात आणण्यास माणूस आजारी पडणार नाही याची शाश्वती देता येते. अशा या अमरावती येथील बडनेरा रोडवरील महेश भवन मध्ये 14 15 व 16 ऑगस्टला संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य शिबिरात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निरोग संस्थेचे प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे श्री नंदकिशोर राठी अरुणभाई टांक सुरेशचंद्र करवा ललित भाई सांगानी डॉ. सत्यनारायण कासट श्री अशोक मुंदडा तसेच निरोग संस्थेचे अध्यक्ष श्री राधेश्याम भुतडा (9765443643) उपाध्यक्ष नंदकिशोर चांडक(9422888027) उपाध्यक्ष प्रा.नारायण लाहोटी(9096310511) व सचिव श्री जगदीश कलंत्री (9423126099)यांनी एका संयुक्त पत्रकारन्वये केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा