*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुखशांती लोप पावली…*
कुठे मोर्चे कुठे आंदोलन
गुन्हेगारीही खूप वाढली
गगना भिडली आज महागाई
सुख शांती लोप पावली
दिवसाढवळ्या खुन बलात्कार
लेक सुरक्षित कुठे ना राहिली
जीव आताशा सतत टांगणीवर
मायबापाची झोप उडाली
पेपरफुटी अन् हेराफेरी
आज भ्रष्टाचारी पावलोपावली
वखवखलेली नजर भुकेली
पैशाविना ना सरकती फायली
मुकी बिचारी कुणीही हाका
जनता नुसतीच भांबावलेली
सुका कधी तर ओला दुष्काळ
कुणी शेतकऱ्यांचा नाही वाली
चढाओढ ती नोकरीसाठी
हैराण पिढी ही आजची झाली
प्रश्न विचारणे झाले दुष्कर
आत्महत्या फार सोपी झाली
मिळेल कैसी झोप सुखाची
वेडी तर मोबाईलने झाली
रातंदिन फक्त घोर जिवाला
सुखशांती आज लोप पावली
@अरुणा गर्जे
सांगली
