You are currently viewing तारांगण

तारांगण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तारांगण*

 

पोर्णिमेची ती होती चांदणी रात्र,

क्षितिजावर हंसत ऊभा पूर्ण चंद्र,

रूपेरी तारकादले चमचमती सर्वत्र,

चांदण्यात नहात झळकती नक्षत्रं.

असंख्य तारका आकाशात,

नक्षत्रांचे प्रकाशदिप या नभांगणात,

स्वप्ननगरीच ही खुलली चांदण्यात,

इंद्रधनूवर रजनी सजली तारांगणात.

रात्रीचा खेळ चालला तारका दलांचा,

लूकलूकत लपाछपीचा,

मधेच पकडला जाई सखा तयांचा,

चांदणचूरा सांडती आनंदाचा.

मेघ त्यांना दडवतो,

चंद्रसखा तयांना शोधतो,

रूपेरी प्रकाश तारकांचा मंदावतो,

चंद्र अर्ध्यावर डाव सोडतो.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा