You are currently viewing सावंतवाडी जिल्हा उद्योग केंद्राच्या तंत्रज्ञान आयटी कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद.

सावंतवाडी जिल्हा उद्योग केंद्राच्या तंत्रज्ञान आयटी कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद.

सावंतवाडी जिल्हा उद्योग केंद्राच्या तंत्रज्ञान आयटी कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद.

सावंतवाडी

विद्यार्थ्यांचा जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED सिंधुदुर्ग आयोजित गवाणकर कॉलेज , सावंतवाडी येथे माहिती तंत्रज्ञान आयटी या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थांचा मोठा प्रतिसाद होता. नवयूद्योजकासाठी ही फार मोठी संधी आहे. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी माननीय शिंगटे साहेब यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजन प्रामुख्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP वर भर दिला. MCED सिंधुदुर्ग चे प्रकल्प अधिकारी माननीय राजेश कांदळगावकर साहेब महाराष्ट्र उद्योजकता विकास MCED कसे उद्योजकतेवर काम करते या बाबत माहिती दिली.उद्योजक होण्याचा सल्ला देऊन शासकीय योजनाचा फायदा कसा घ्यावा हे सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी DIC शिंगटे साहेब, MCED चे राजेश कांदळगावकर,रोहित परब, गवाणकर कॉलेज चे प्रा.शैलेश गावडे हे ही उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या आयोजक MCED च्या समन्वयक सुषमा साखरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा