You are currently viewing महसूल सप्ताहानिमित्त अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे 

महसूल सप्ताहानिमित्त अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे 

 

परवा सुप्रसिद्ध लोकप्रिय व कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे आमच्याकडे येऊन गेले. एक ऑगस्ट ही जी तारीख. एक ऑगस्टला महसूल दिवस सर्वत्र साजरा होतो. हा महसूल मात्र दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला तो अमरावतीला. निमित्त होते श्री तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाचे. वीस हजाराची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

मागील महिन्यातच महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे आयएएस हे आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाच्या रौप्य महोत्सवासाठी अमरावतीला आले होते. सायंकाळी त्यांच्या सन्मानार्थ विश्राम भवनामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. प्रामुख्याने अमरावती शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या कार्यक्रमात अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांची अमरावतीला आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच भेट झाली. त्यापूर्वी मी त्यांना नाशिकला व त्याहीपूर्वी आमची मिशन आयएएसयची टीम त्यांना गोंदियाला जाऊन भेटली होती. विश्राम भवनात श्रीमती नयना गुंडे यांना मी दीपस्तंभ हे 35 आयएएस अधिकारी यांच्या यशोगाथा समाविष्ट असलेले पुस्तक सप्रेम भेट दिले. व्हिडिओ कॉन्फरन्स असल्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकले नाही अशी खंतही विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी व्यक्त केली.

नाशिकला आदिवासी विभागाच्या आयुक्त असताना मी त्यांना माझे जूनियर आयएएस प्रकल्पाचे प्रमुख लातूरचे श्री ओम प्रकाश जाधव त्यांच्यासह भेटलो होतो. जूनियर आयएएस म्हणजे दुसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना एका रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारा प्रकल्प.

मी नाशिकला पोहोचलो. गाडी पार्क केली. आणि आदिवासी आयुक्त कार्यालयात पोहोचलो.

माझे व्हिजिटिंग कार्ड आत मध्ये पाठविले .लगेच मॅडमनी आम्हाला आत मध्ये बोलाविले. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पावर चर्चा झाली. मॅडमनी तो प्रकल्प समजावून घेतला. आणि त्या म्हणाल्या हा प्रकल्प चांगला आहे .तुम्ही तयार केलेली पुस्तकेही चांगली आहेत. आमच्या सगळ्या प्रकल्प अधिकाऱ्यांना हा उपक्रम त्यांच्या भागात राबविण्यास सांगते. याहीपेक्षा मोठा प्रकल्प असेल तर मी त्यांना निश्चितच मदत करेल. तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार करा आणि तो माझ्याकडे समाविष्ट करा. मला ते अधिकार आहेत.

मॅडम पुढे म्हणाल्या. अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना असलेल्या अधिकार क्षेत्रात ते तुमची सर्व पुस्तके विकत घेऊ शकतात. आणि हा ज्युनिअर आयएएस प्रकल्प देखील राबवू शकतात.

मॅडमनी आमचे योग्य आदरातिथ्य केले आणि आम्ही निघालो. नाशिक जिल्ह्यातील कळवण जवळ असल्यामुळे व तिथे माझे नातेवाईक श्री विशाल नरवाडे हे प्रकल्प अधिकारी असल्यामुळे आम्ही आमची गाडी कळवणकडे वळवली. श्रीमती नयना गुंडे यांची माझी झालेली ही पहिली भेट.

आमच्या मिशन आयएएसच्या 24 जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत. या सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांना आयएएस या भारतातील सर्वात मोठ्या परीक्षेचे एका रुपयामध्ये प्रशिक्षण दिल्या जाते.

गोंदिया जिल्ह्यातील देवरी या आमच्या मिशन आयएएस केंद्रातून श्री संजय काशीवार विभागीय संचालक मिशन आयएएस यांचा फोन आला. ते म्हणाले सर गोंदिया येथे श्रीमती नयना गुंडे मॅडम जिल्हाधिकारी आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांना भेटायला घेऊन जायचे आहे. मी म्हटले तुम्ही जा

त्या निश्चित भेटतील. कारण मला माहित होते की त्यांची मुलगी नुकतीच आयएएस झाली होती. जो अधिकारी आपला मुलीला अधिकारी करू शकतो तो इतरांना निश्चितच न्याय देऊ शकतो.

मी लगेच गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लावला. योगायोगाने आमचे मित्र श्री राजेश खवले त्याच ठिकाणी राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हाधिकारी व विद्यार्थी यांचा समन्वय घडून आणण्याचे ठरविले. देवरी वरून मॅडमला भेटायला विद्यार्थी आहेत असा निरोप श्री राजेश खवले मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचला. भेटीची तारीख ठरली. भेटीची वेळ ठरली. विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विद्यार्थी तयारीला लागले. गाडी ठरविण्यात आली.

आणि भेटीचा तो दिवस उगवला. गोंदियाच्या जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांची भेट होणार म्हणून विद्यार्थी प्रफुल्लित होते. देवरी वरून गोंदियाला पोहोचताच गाडी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. देवरी वरून मुले भेटायला येणार आहे याची कल्पना मॅडमला होतीच.

सर्व मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. मुले आल्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांचे संमती मिळताच सर्व अध्यापक व विद्यार्थी जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांच्या कक्षात आले. मॅडमने सर्वांना स्थानापन्न होण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. मॅडमनी प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली. त्यांच्याशी चर्चा केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे आदरतिथ्य केले.

जिल्हाधिकारी मॅडम स्वतः आदरतिथ्य करीत आहेत हे पाहून विद्यार्थ्यांना देखील खूप आनंद झाला आणि त्या आठवणी घेऊनच ते सर्व शिक्षक व विद्यार्थी देवरीला परतले.

श्रीमती नयना गुंडे यांनी आपला थोडा वेळ दिला तसेच मुलांचे आदरतिथ्य केले हा प्रसंग विद्यार्थी त्यांच्या जीवनात कधीच विसरू शकत नाही आणि त्यातूनच उद्याचे सनदी व राजपत्रित अधिकारी तयार होणार आहेत या शंकाच नाही. अशा या लोकाभिमुख विभागीय आयुक्तांना महसूल सप्ताहानिमित्त निमित्त हार्दिक शुभेच्छा.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

444602

प्रतिक्रिया व्यक्त करा