मालवण :
कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या वतीने नुकताच विविध क्षेत्रात गुणवंत काम केलेल्या १२ गुणवंतांचा सत्कार दत्तात्रय मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
गुरुनाथ ताम्हणकर आणि रश्मी आंगणे — बोलतो मराठी पुस्तकाचे सादरीकरण, द. शि. हीर्लेकर आणि उज्वला धानजी — तितिक्षा सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, वंदना राणे — पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळावर निवड, कल्पना मलये– इयत्ता ६ वी च्या पाठ्यपुस्तकात मालवणी पाठाची निवड, विजयराव देसाई — निसर्ग छाया चित्रकार, विजय चौकेकर — अंधश्रद्धा निर्मूलन आदर्श कार्य, अशोक कांबळी — योग शिक्षक परीक्षा उत्तीर्ण, रामचंद्र वालावलकर — पत्रकार पदविका उत्तीर्ण, जितेंद्र राणे — उत्कृष्ट मृदंग वादक, पवनकुमार पराडकर — उत्कृष्ट नेपत्य आणि रंगभूषाकार.
वरील मान्यवरांचे सत्कार रुजारीओ पिंटो, डॉ. प्रमोद कोळंबकर, तात्या भिसळे, रामचंद्र आंगणे, निलेश सरजोशी, सुरेश गावकर, दत्तात्रय मुळीक , प्रकाश पेडणेकर आणि अशोक पाडावे. यांच्या हस्ते झाले. याचवेळी कोमसाप मालवणच्या वतीने दत्तात्रय मुळीक यांनी ब्रेल लिपी मध्ये पुस्तक रुपांतरित झाले बद्दल सुरेश शामराव ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शेवटी सुरेंद्र सकपाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
