You are currently viewing संकल्प इनफ्रास्ट्रक्चर तर्फे शालेय वस्तूंचे वाटप 
Oplus_16908288

संकल्प इनफ्रास्ट्रक्चर तर्फे शालेय वस्तूंचे वाटप 

चिखली, प्राधिकरण – श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्यांचे वाटप करण्यात आले.

संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. चे सर्वेसर्वा प्रोप्रायटर मा. संदिपजी तापकीर यांचे मार्फत ४२ गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, २०० पानी व १०० पानी वह्या यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री वाल्हेकर सर माजी प्राचार्य श्री वाघेश्वर विद्यालय चऱ्होली, मा. श्री. परेश कटारिया प्रोप्रायटर, परेश टेक्सटाईन उपस्थित होते. यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मोलाची मदत झाली.

या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला.

विद्यालयाचे प्राचार्य मा .सानप सर, उपमुख्याध्यापिका मा. नाणेकर मॅडम, पर्यवेक्षिका मा .ठोंबरे मॅडम व पर्यवेक्षिका मा. पंडित मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका मा. श्यामला पंडित मॅडम यांनी केले .प्रमुख पाहुणे श्री वाल्हेकर सर मा. प्राचार्य श्री वाघेश्वर विद्यालय चऱ्होली यांनी संकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि विषयी माहिती दिली. गेली अनेक वर्ष या माध्यमातून ते गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करत असतात.

मा. बुरुड मॅडम यांनी सूत्रसंचलन केले. मा. शेवाळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा