You are currently viewing एस पी के कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

एस पी के कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

*एस पी के कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन*

सावंतवाडी

*राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या शनिवारी दिनांक १८ जुलै २०२६ रोजी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी व पालकवर्ग, सेवाभावी भारतीय संस्था, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.*
*हे रक्तदान शिबीर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत एस पी के कॉलेज, सावंतवाडीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.*
*इच्छुक रक्तदात्यांनी योगेश चव्हाण (9404779941), गिरीश सावंत (9326611071), ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते सदस्य मंगेश माणगावकर (7498621235) तसेच सचिव बाबली गवंडे (8390905269) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (9422967249) आणि यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.*
*त्याचप्रमाणे रक्तदान करण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी खालील लिंक ओपन करून त्यातील गुगल फॉर्म भरावा व आपण येत असल्याचे निश्चित करावे ही विनंती.*

*https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdS_fqg4HthT-MvQo6mz7gp_BP44irgdNvvjkdLz5QY0dlZtw/viewform?usp=header*

 

राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक चांगला कार्यक्रम करावा असं प्रशालेने ठरवलं. त्यानुसार विपरीत परिस्थितीत रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांची रक्ताची तातडीची गरज पूर्ण करून त्यांचे बहुमोल जीव वाचवण्याचे कार्य म्हणजे रक्तदान करणे आणि पुण्यतिथीचा योगायोग साधून आम्ही रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि शालेय कार्यक्रमांमध्ये याचा समावेश करण्याचे कारण म्हणजे शाळेत शिकणारी मुले आहेत, ती देशाची भावी पिढी आहे त्या भावी पिढीला रक्तदानाचे महत्त्व कळावे, त्यांच्यात त्याच्याविषयी जाणीव जागृती व्हावी, यासाठी पालकांनाही समाविष्ट करून घेऊन आम्ही हे रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. आपले पालक रक्तदान करत आहेत आणि एक चांगले कार्य करत आहेत, हा संदेश प्रत्यक्षपणे मुलांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यात कोणालाही रक्ताची गरज भासली तर रक्तदान करून त्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ते प्रेरित होतील. अशा भावनेने आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. रक्तदान क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था सोबत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही शिक्षक वृंद आणि प्रशालेच्या सहकार्याने आम्ही रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. तरी आपणही पालक, शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थी आणि सेवाभावी संस्थांचे रक्तदाते या सर्वांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे ही विनंती. .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा