फोंडाघाट 1982 ग्रुपचे आंबोलीत गेट-टुगेदर; निवृत्त मित्रांनी अनुभवला निसर्गाचा मनमोहक सहवास
धबधबे, पर्यटनस्थळांची सफर आणि जुन्या आठवणींना उजाळा; 62 वर्षांवरील मित्रमंडळींचा उत्स्फूर्त सहभाग
आंबोली :
फोंडाघाट 1982 ग्रुपच्या वतीने आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमात 62 वर्षांवरील निवृत्त मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. आंबोलीतील विविध पर्यटनस्थळे, धबधबे आणि निसर्गरम्य परिसराची सफर करत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या सहलीत सीमा वालावलकर, सुधीर धुरी, सौ. धुरी, सुधीर सावंत, भरत चिके, शरद सावंत, दत्तू साळवी, सुजल सामंत, अजित नाडकर्णी, बाळा मुंडये, संतोष टक्के, अनिल सामंत, सौ. सामंत, अजित वैगणकर आदी मित्रमंडळी सहभागी झाली होती. सर्वांनी एकत्र येत आनंदाचे क्षण अनुभवले आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या गेट-टुगेदरचे नियोजन सीमा वालावलकर, बाळा मुंडये, सुधीर धुरी आणि सुधीर सावंत यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला. सहभागी मित्रांनी अशा भेटीगाठी नियमित आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
