*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*वटपौर्णिमा पूजन की——–?*
मागील वर्षी सजून, नटलेल्या महिलांना मुंबईत वटपौर्णिमेची खरेदी करताना पाहिलं. मुंबईसारख्या धावपळीचे जीवन असणाऱ्या शहरात काम करणाऱ्या महिला कामावरून येताना वडाच्या फांद्या, पाने आणि पूजेचे सामान नेतांना दिसल्या. एक क्षण खूप बरं वाटलं. वाटलं, आजही महिला एवढ्या व्यस्त दिनचर्येतून आपली संस्कृती जपत आहे. पण एका क्षणात माझ्या आनंदी डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहायला लागला. अहो ज्याची पूजा करायची त्यालाच तोडायला निघालात? म्हणजे “पाय लावून नमस्कार करणं” झालं. वडाच्या झाडाला बोडखे करून त्याच्याकडून आशीर्वाद मागता? त्याच्या डोळ्यात अश्रू देऊन तुम्ही आनंदाने सण साजरा करता? उद्या त्याच बोडक्या झाडाखाली उभं राहून तुम्ही त्याच्याच कडून सावलीची अपेक्षा कराल. किती विरोधाभास आहे नाही? कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण कृतघ्न पणे वागतो. असंच चित्र अनेक शहरातही आजकाल बघायला मिळतं.
हे असं झालं, एखाद्याचे हात पाय कापून त्याची पूजा करायची. त्या झाडाला छिन्न विच्छिन्न,विद्रूप केल्यावर ते झाड तुम्हाला आशीर्वाद देईल का? माझी खात्री आहे नक्कीच आशीर्वाद देणार नाही.
मग? वडाचे पूजन तर करायचं आहे. वडाचे झाड जवळपास नाही, आणि वेळही नाही. मग? मग काय करायचं?
माझ्या स्वानुभवाने सांगते. एके वर्षी मलाही वडाची फांदी घरी आणावी लागली. मी त्या फांदीचीच पूजा केली. पण मन मात्र स्वतःला कोसत होतं. पतीशी बोलणं झाल्यावर त्यांनी सांगितलेला उपाय मी केला. तोच मोलाचा उपाय तुम्हाला सांगावस वाटला.
मैत्रिणींनो सध्या पावसाळा आहेच. कुठे वडाच्या झाडाची छाटणी केली असेल तर ती फांदी नक्की लावा.या फांदीला त्याच कुंडीत वर्षभर ठेवा त्याची काळजी घ्या. काही महिन्यातच त्या फांदीला मुळे येतील. आणि छान झाड आकाराला येईल.आपल्याला नवनिर्मितीचा आनंद मिळेल.पुढच्या वर्षी त्या झाडाचीच पूजा करा. आणि दरवर्षी आपण लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा केल्याचं समाधानही मिळवा.
घरच्या थोड्या मोठ्या कुंडीतही हे झाड अनेक वर्ष राहतं. याच झाडाच्या फांद्यांची छाटणी करून पुन्हा दर वटपौर्णिमेला एक झाड तयार करून बागेत, मोकळ्या जागेत, आपल्याला लावता येईल किंवा आपल्याच मैत्रिणीला वटपौर्णिमेला भेट देता येईल.
आपला हा वसा इतरांना पुढे चालवण्यास प्रोत्साहन देऊया आणि निसर्गातील झाडांची कत्तल थांबवून वृक्ष संवर्धन करूया. आणि येत्या वटपौर्णिमेला त्याच छाटलेल्या फांदीला पारंब्या आलेल्या आपल्या वडाच्या झाडाची पूजा करा. मैत्रिणींनो एकदा कापलेल्या फांदीपासून मी आज चार वडाच्या झाडांची आई झाली आहे. आणि हो त्यातील दोन झाड मी माझ्या मुलींना त्यांच्या लग्नात रुखवतात देणार आहे बर का! त्यांनी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्याही झाडाची कत्तल करू नये म्हणून.
चला तर मग या पावसाळ्यात प्रत्येकीने छाटलेल्या वडाची एक किंवा दोन फांद्या लावूया. एकीचे झाड करून त्याची पूजा करूया, तर दुसऱ्या झाडाला योग्य जागेत लावून निसर्गाचे ही आशीर्वाद घेऊया. समाधानाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करूया.
सौ सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापिका
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार
================================
मिळवा अतिरिक्त *रु. ७४,९९९/-** पर्यंत चे ॲानरोड किंमतीवर फायदे
त्वरा करा…!!!
💚ॲाफर केवळ ३० जून पर्यंत💚
देशाची सर्वात सुरक्षित ५ स्टार ग्लोबल एनकॅप ने प्रमाणित कार आहे
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
देशाची सर्वात जास्त विकली जाणारी कार
👊🏼💚 *पंच* 💚👊🏼
✅ *इन बिल्ट फ़ीचर्स*
एसी, पॉवर स्टीयरिंग , ऑल पॉवर विंडोज , ८’ टच स्क्रीन इंफ़ोटेनमेंट सिस्टम विथ एंड्राइड ऑटो अँड अँपल कार प्ले, ४ स्पीकर्स, रिवर्स एचडी कॅमेरा, ड्राइवर सीट हाइट एडजस्टमेंट, रिमोट सेंट्रल लॉकिंग, ६ एअर बैग्स, फुल व्हील कवर्स स्पेयर व्हील सहित, १९३ एमएम ईतका सर्वोत्तम ग्राउंड क्लीयरेंस
✅ *ऑन रोड प्राइस मधील एक्सेसरीज़*
३डी फ्लोअर मॅट, मड फ्लॅप, सीट कव्हर लेदरेट, डोअर वायजर, टेल गेट क्रोम गर्निश, नंबर प्लेट फ्रेम, जेल फ्रेशनर, गणेश आयडॉल.
✅ *ऑन रोड प्राइस मधील कार केअर पॅकेज*
पेण्ट प्रोटेक्शन आणि अँटी रस्ट ट्रीटमेण्ट
✅ *इन्शुरन्स अंतर्गत कवरेज:-*
झिरो डेप्रिसिएशन , रिटर्न टू इनवॉइस , ईंजिन प्रोटेक्शन, की प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्शन, रॅट बाईट.
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
एस.पी.ॲाटोहब
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली । ओरस
7377-959595
_T&C apply offer applicable for in stock MY2025 car_
