विद्यार्थ्यांना हसविणारा अध्यापक
प्रा.एस एस जोशी
अमरावतीचे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय हे आज संपूर्ण विदर्भामध्ये चर्चेत आहे. या महाविद्यालयामध्ये सातत्याने विविध उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. या लाहोटी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून कर्मचारी म्हणून प्राध्यापक म्हणून मी अनेक वर्ष काम केले आहे. या महाविद्यालयातील आठवणीवर एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल इतके अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
या अनुभवामध्ये लक्षात राहण्यासारखे जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक असलेले आणि आता वयाची 84 वर्ष पूर्ण केलेले प्रा.एस एस जोशी यांचा समावेश आहे. दिलखुलास वागणे कसे असते ते या माणसाकडून शिकले पाहिजे. विद्यार्थीभिमुख प्राध्यापक म्हणून यांचा गौरव केला पाहिजे. हा माणूस इंग्रजीचा पण अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा. समाजातील बारीक सारीक गोष्टी टिपणारा.त्यांना
इंग्रजीबरोबर आवड होती ती खेळायची. आमचे क्रीडा शिक्षक होते देविदास बेलसरे. त्यांच्या मदतीला आले प्रा. ज्ञान कोठारी. क्रीडा क्षेत्रातील आपुलकीमुळे प्रा. एस एस जोशी देखील नकळत या खेळ कंपनीमध्ये सहभागी झाले.
जोशीसरांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये प्रत्येक कृतीमध्ये जिव्हाळा आपुलकी आत्मियता याची ओल होती आणि ती खूप खोल होती. खोटे हसू खोटे रडू खोटीच ही आश्वासने असा भाव त्यामध्ये नव्हता. त्यांचे डोळे बोलके होते. त्यामधून तो ओलावा ओसंडून पाहत होता. म्हणूनच इतके वर्ष झाले तरी ते आमच्या कुटुंबातीलच वाटतात.
आम्ही विद्यार्थी .खरं म्हणजे ते आम्हाला शिकवीत नव्हते .पण आम्ही त्यांच्या तासाला जाऊन बसत होतो .आम्हाला इंग्रजी शिकवायचे नंदे सर. पण त्यांचा तास करून आम्ही जोशी सरांच्या तासाला जाऊन बसायचो.
एक वेळ मला आठवते जोशी सरांनी उचकी या विषयावर एक तास आम्हाला अभिनय करून दाखविला .आम्ही हास्याच्या सागरात उचंबळ्या मारत होतो. पण सर मात्र आपल्या अभिनयात दंग होते .ते हसले नाहीत पण इतरांना त्यांनी सतत हसवलं.
मी विद्यार्थी होतो तेव्हा त्यांच्या नजरेत भरलो. काय नरेश या त्यांच्या बोलण्यात जिव्हाळा होता. पुढे कर्मचारी झालो. तोच जिव्हाळा कायम होता. पुढे त्यांच्याच बरोबर प्राध्यापक झालो. मग तर सम व्यवसायी झालो. तोच जिव्हाळा कायम होता आणि आज सर पुण्याला स्थायिक झाले तरी तो जिव्हाळा कायम आहे आणि म्हणून पुण्याला गेलो की जोशी सरांच्या घराकडे पाउले नकळत वळतात .पाऊले चालती पंढरीची वाट या आर्त भावनेने.
आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा वाणिज्य शाखेकडे विद्यार्थिनींचा कल नव्हता. आमच्या लाहोटी महाविद्यालयाची पहिली विद्यार्थिनी म्हणजे शिल्पा प्रधान. तिचे वडील जयका मोटर्समध्ये कार्यरत होते. ती जोशीसरांची अतिशय आवडती विद्यार्थिनी. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी दुसऱ्या वर्षी आली ती नीलिमा वैद्य. आता तर लाहोटी महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त असतील असे वाटते.
जोशीसर विद्यार्थ्यांमध्ये मिसळत होते. हास्यविनोद चालायचे .कधी मालटेकडीवर तर कधी वडाळी तलावावर तर कधी विदर्भ महाविद्यालयाच्या स्टेडियमवर मॅच सुरू होण्याआधी आणि मॅच सुरू झाल्यानंतर त्यांची कॅसेट सुरू असायची. त्यांची ती कॅसेट कधीच संपूच नये असे वाटायचे.
बरं त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त असायची .आम्ही त्यांना नमस्कार केला किंवा गुड मॉर्निंग म्हटलं तर ते म्हणायचे बघ आज ही तारीख आहे. या तारखेला यांचा यांचा वाढदिवस आहे आणि नकळत चार-पाच नाव ते सहज घेऊन टाकायचे. बोलता बोलता एखाद्या मोठ्या माणसाचं नाव निघालं तर गुगल प्रमाणे ते भराभर त्या माणसाची कुंडली सांगायचे .याचा अर्थ त्यांचे वाचन लेखन चिंतन अगाध होते .त्याचमुळे ते पुस्तकाला न लावता गुगल तर नव्हतेच ते भराभर भराभर आमच्यासमोर उलगडून दाखवीत होते .
एक वेळेस ते व मी वडाळी तलावावरून कॉलेजकडे येत होतो. विश्रामभवन समोरून आम्ही स्कूटरने चाललो होतो .जोशी सर मला म्हणाले या सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो मुख्य आहे. त्याचा नंबर काढून मला दे .मी म्हटलं काय काम आहे. तर ते म्हणाले या विश्रामभवननाच्या प्रवेशद्वारावर जी पाटी लावलेली आहे ना त्यामधील स्पेलिंग चुकलेले आहे. स्कूटर चालविताना इतके बारीक लक्ष आणि स्पेलिंग मधली चूक लक्षात घेणारा हा प्राध्यापक म्हणूनच आमच्या दीर्घकाळ लक्षात राहिला.
ते प्राध्यापकांना हसवायचे. मुलांना हसवायचे. कर्मचाऱ्यांना हसवायचे. स्वतः मात्र स्थितप्रज्ञ राहायचे. याला खूपच मोठी ताकत लागते. अनेक वेळा विनोद सांगणारा हसतो. बाकीचे लोक हसतच नाही. इथे मात्र उलटे होते. त्यांची सांगण्याची शैली इतकी विलक्षण होती की काल-परवा त्यांना म्हटले सर तुम्ही जर एकपात्री प्रयोग केले असते ना तर सर्व महाराष्ट्राला हसविले असते.
त्यांच्याकडे पाहिलं की मला दिलीप प्रभावळकरांची आठवण येते. दोघांच्या चेहऱ्यामध्ये व हावभावामध्ये सादरीकरणामध्ये बरेचसे साम्य आहे. पण हा माणूस ज्या काळात या अभिनयाच्या गोष्टीला फार मागणी होती त्या अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला नाही तर त्याने त्याच्या कृतीने इतका चांगला जिवंत अभिनय केला की त्यातून विलास घोडेस्वार सारखा सनदी अधिकारी सुभाष च-हाटे सारखा दिलदार उद्योजक आणि विनोद जोशी सारखा लेह लडाख मणिपूर नागालँड सेव्हन सिस्टर्स सारख्या दुर्गम भागातून आपल्या गाडीने आपला ड्रायव्हिंगचा छंद जोपासणारा व मित्रांना जपणारा माणूस तयार झाला. खरं म्हणजे अशी जोशी सरांवर प्रेम करणाऱ्या लोकांची यादी फार मोठी आहे.
प्रा. एस एस जोशी यांनी खूप मुलांना घडविले. स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले. खरं म्हणजे वाशीम जिल्ह्यातील मेडशी या तालुक्याच्या गावातून पुढे आलेले जोशी सर हे हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्यामध्ये मिसळणारे दीपस्तंभ ठरले. रहे ना रहे हम महका करेंगे ही ओळ त्यांना तंतोतंत लागू पडते. ते प्राध्यापकांमध्ये कमी आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्त वावरायचे. अर्थातच तत्कालीन प्राध्यापकांनी त्यांचा हेवा वाटत असणारच.
आम्ही ज्या काळात शिकत होतो तो काळ म्हणजे प्राध्यापकांचा सुवर्णकाळ होता. सगळ्या प्राध्यापकांविषयी प्रचंड आदर होता. आमचे सर जरी आम्हाला भेटले तरी आम्ही त्यांना वाटेत वाकून नमस्कार करीत होतो. प्राध्यापकांचा दबदबा होता. अमरावती मधीलच प्रा. मधुकर केचे प्रा. बी टी देशमुख प्रा. श्रीधर तट्टे प्रा. प्रभा गणोरकर प्रा. वसंत आबाजी डहाके प्रा मनूताई नातू प्रा.विजया डबीर प्रा. बी जी कडू प्राचार्य अण्णासाहेब वैद्य असे कितीतरी नावे त्याकाळची घेता येतील की ज्यांचा त्या काळात प्रचंड मोठा नावलौकिक होता. त्यातीलच एक जीवाभावाचा प्राध्यापक होता .त्या माणसाचे नाव प्रा.एस एस जोशी
सर परवा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुठल्यातरी कार्यक्रमासाठी आले होते. मी त्यांना आवर्जून माझ्या महापौराच्या बंगल्यासमोरील घरी घेऊन आलो. सरांना खूप बरे वाटले. आपला विद्यार्थी आपला कर्मचारी आपला सहकारी आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मी सरांना म्हणालो सर तुम्हाला कॅन्सर झालाय असं मी ऐकलंय. सर हसत म्हणाले अरे नरेश त्यात काय. अगोदर सर होतो .आता त्याला समोर कॅन लागलाय एवढेच काय ते. कॅन्सरवर इतका हळुवारपणे व्यक्त होणारा हा प्राध्यापक म्हणूनच आगळावेगळा आहे त्यांनी कॅन्सर किती सहज घेतला. कोणताही बाऊ केला नाही .कोणतीही धास्ती घेतली नाही. उलट त्यावर विजय मिळवला आणि म्हणून आज वयाची 84 वर्ष पूर्ण केली तरी ते जसे लाहोटी महाविद्यालयामध्ये होते तसेच आहेत आणि तसेच राहणार आहेत.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस अमरावती
9890967003
_________________________
*संवाद मीडिया*
*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*
*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*
*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*
*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*
*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*
*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*
*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*
*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*
*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*
*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*
*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*
*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*
*📞 संपर्क : 74100 06037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
