You are currently viewing गरिबांच्या मदतीला धावले विशाल परब; मोडकळीस आलेल्या घरातील कुटुंबाला तत्काळ मदत
Oplus_16908288

गरिबांच्या मदतीला धावले विशाल परब; मोडकळीस आलेल्या घरातील कुटुंबाला तत्काळ मदत

सुरक्षित छत व उपचारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

सावंतवाडी:

इन्सुली पागावाडी येथील ६५ वर्षीय वृद्ध विधवा माता श्रीमती जनाबाई धोंडू पाटील आणि त्यांचा गंभीर आजारी मुलगा शाहू पाटील हे अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात जीव मुठीत धरून राहत आहेत. घराचे छप्पर उडून गेले असून पंधरा दिवसांपूर्वी भिंतीचाही मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे पावसाळ्यात या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून “यंदाच्या पावसात अंगावर कसा काढायचा आणि आम्ही जिवंत गाडले जाऊ का?” या भीतीत त्यांचे दिवस जात होते.

या कुटुंबाची विदारक परिस्थिती इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच विशाल परब यांनी कोणताही विलंब न लावता या कुटुंबाला सुरक्षित छत मिळवून देण्यासाठी तसेच शाहू पाटील यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी परिस्थितीची पाहणी करून विशाल परब म्हणाले की, पावसाळ्यात एका वृद्ध माऊलीला आणि आजारी भावाला अशा अवस्थेत सोडणे माणुसकीला धरून नाही. त्यामुळे या कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच त्यांच्या आवश्यक उपचारांसाठीही सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशाल परब यांच्या या तत्परतेमुळे आणि प्रत्यक्ष कृतीतून केलेल्या मदतीमुळे इन्सुली परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “गरिबांचा खरा नाथ विशाल परब” अशा भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत असून संकटात सापडलेल्या या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा