You are currently viewing माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सावंतवाडी तालुक्यात यशस्वी करूया – श्री निलेश जाधव गटविकास अधिकारी.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सावंतवाडी तालुक्यात यशस्वी करूया – श्री निलेश जाधव गटविकास अधिकारी.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सावंतवाडी तालुक्यात यशस्वी करूया – श्री निलेश जाधव गटविकास अधिकारी.

सावंतवाडी

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान ची तालुका स्तरीय समिती सभा 23/6/26 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मां श्री निलेश जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी, सचिव डॉ रमेश कर्तस्कर तालुका आरोग्य अधिकारी, श्री इच्छाराम साधले वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय प्रतिनिधी सदस्य श्री शोभराज शेर्लेकर गटशिक्षण अधिकारी श्रीम छाया घाडीगावकर प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, श्रीम शुभदा कविटकर कृषीअधिकारी /ग्रामपंचायत प्रतिनिधी श्रीम क्षमा पुराणिक आरोग्य पर्यवेक्षक, श्रीम सुवर्ण खरात विस्तार अधिकारी आरोग्य, डॉ विक्रम मस्के, प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड डॉ पूजा पाताडे प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे, श्रीम अक्षता माळकर प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली प्रतिनिधी, श्रीम साक्षी जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली प्रतिनिधी, श्री अरुण गवस प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा प्रतिनिधी श्रीम विनिता दळवी समूह संघटक, श्री रवि जाधव सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडी, श्री विनायक गावस पत्रकार प्रतिंनिधी व श्री शंकर परब आरोग्य सहाय्यक सावंतवाडी, यांच्या उपस्थितीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वाचे स्वागत करून सभा कामकाज चालविले यात गतवर्षी उद्दिष्ट निहाय झालेल्या कामाची प्रगती वाचन करण्यात आली आज अखेर सद्यस्थिती मुद्द्याच्या उद्दिष्ट निहाय कामाची स्थिती सचिव यांनी सभागृह समोर मांडली यात प्रामुख्याने ८०% झालेल्या गावांना पाठपुरावा करून १००% कसे करता येईल याच नियोजन करण्यात आले तर उर्वरित गावेही १००%होतील यादृष्टीने पाठपुरावा करण्यात यावा अजून ९महिने कालावधी आहे आणि आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायती ५कोटी बक्षीस साठी पात्र होतील असे आवाहन मां अध्यक्ष यांनी केले यात प्रामुख्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने करायचे कामकाज लोकसहभाग समन्वय साधून प्रयत्न करावेत यातून आपली ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, व पंचायत समिती सावंतवाडी ही स्पर्धेत येतील सावंतवाडीचे नाव उज्वल होईल यातील अडचणी लक्षात येण्यासाठी झालेल्या कामाची माहिती ग्रामपंचायत यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आली आहे गुण वाढविण्यासाठी मुद्दे कोणते आहेत याचाही मार्गदर्शन करण्यात आले आयुष्मान कार्ड नोंदणी वापर उपयोग तसेच शिल्लक काम पुर्ण करण्यासाठी सामाजिक बाधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या बाबत शंका निरसंनही करण्यात आले सर्व माझं गाव आरोग्य संपन्न गाव कामकाज यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करून उपस्थितांचे आभार श्री शंकर परब आरोग्य सहाय्यक सावंतवाडी यांनी व्यक्त करून मां अध्यक्ष यांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले
अशी सुंदर आशादायी व परिणामकारक प्रयत्नांना यश येईलच अशी अशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा