सावंतवाडी:
कै.प्राध्यापक उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव या संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे. यावेळी मागील आर्थिक वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून सन 2025 – 26 चा अहवाल व जमाखर्च मंजुरी देणे, 2026-27 वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे, 2026-27 वर्षासाठी विषय तपासणीसाठी नेमणूक करणे, ग्रंथालयाचा रौप्यमहोत्सव साजरा करणे, वार्षिक सर्वसाधारण सभेची संस्थेची सूचना सभासदांना डिजिटल माध्यमातून द्वारे देण्यास मान्यता देणे, आदि विषयावर चर्चा होणार आहे. वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर, कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी सभासदांना उपस्थितीचे उपस्थितीचे आवाहन केले आहे.
