You are currently viewing आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

कुडाळ

परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे एन.एस.एस. विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदा येथील प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री मुकुंद धुरी हे होते. यावेळी प्रा. स्वप्नाली सिंगनाथ, प्रा. समीक्षा परब, प्रा. पूनम गावडे, प्रा. रामदास पास्ते, श्री. जगदीश तेंडुलकर तसेच इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूनम गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामदास पास्ते यांनी केले.

योगासनांच्या महत्त्वाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. आरोग्यदायी जीवनाला साथ देणाऱ्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

✨*”योग करा, निरोगी रहा… वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा..!”*✨

🌱 *निरोगी शरीर • निरोगी मन • हरित पर्यावरण* 🌱

प्रतिक्रिया व्यक्त करा