You are currently viewing स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधात अभिषेक गावडे आक्रमक; शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधात अभिषेक गावडे आक्रमक; शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधात अभिषेक गावडे आक्रमक; शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

महावितरणला ग्राहकांना पूर्वसूचना देण्याची मागणी; विश्वासात घेऊनच स्मार्ट मीटर बसविण्याचे आवाहन

कुडाळ

वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात श्री. गावडे यांनी म्हटले आहे की, सध्या वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, हे मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा सूचना दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांना योग्य ती माहिती व पूर्वसूचना देणे आवश्यक असून त्यांच्या संमतीशिवाय मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. महावितरणने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन स्मार्ट मीटर बसविताना आवश्यक खबरदारी घ्यावी. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही अभिषेक गावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा