You are currently viewing अंतरंग उजळले…

अंतरंग उजळले…

*ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंतरंग उजळले…!*

 

जेव्हा कधी

पहाट उजळते लख्ख

होतो थक्क

पाहुनिया…

 

अंतरंग उजळले

सूर्य कोवळा पाहता

लाभे कोवळीकता

मनाला…

 

जेव्हा सकाळ

लख्ख उजळते उन्हात

दिसते घनात

प्रभा…

 

मनाची सकाळ

जेव्हा अशी उजळते

तेजोरसात नहाते

रुपेरी…

 

सायंकाळी घरट्यात

जेव्हा येतात पक्षी

ठरवतात नक्षी

रांगोळीची…

 

एकेकाळी सायंकाळी

किती रंग फाकले

आपोआप झाकले

काळाने…

 

संध्येनेही सांजवेळी

असे अंतरंग उजळले

रंग उधळले

सुवर्ण…

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा