You are currently viewing फार्मर आयडी नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवा

फार्मर आयडी नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवा

फार्मर आयडी नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवा

शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
ॲग्रीस्टॅक (Agristack) उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कार्यालयात येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्याचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक कार्यालयाबाहेर फार्मर आयडी कसा काढायचा याबाबतची माहिती असलेली प्रसिद्धीपत्रके लावून नागरिकांना मार्गदर्शन करावे.
ग्रामीण भागातील व्हॉट्सॲप समूह तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती घराघरांत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अधिकाधिक शेतकरी फार्मर आयडी प्रणालीशी जोडले गेल्यास कृषी क्षेत्रातील योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि शेतकरी-केंद्रित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा