आकाश फिश मिल व SSPM मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने दोन ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन
१७ जून रोजी पाट (मतकरीवाडी) येथे तर २७ जून रोजी केळूस येथे शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन
कुडाळ :
आकाश फिश मिल अँड फिश ऑइल प्रा. लि., वेंगुर्ला आणि SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरांमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी, मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
उपलब्ध वैद्यकीय विभाग :
जनरल मेडिसिन
कान, नाक व घसा (ENT)
नेत्ररोग विभाग
दंतचिकित्सा विभाग
स्त्रीरोग व प्रसूती विभाग
अस्थिरोग विभाग
बालरोग विभाग
शिबिरातील विशेष तपासण्या :
ईसीजी (ECG)
ब्लड शुगर (मधुमेह तपासणी)
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आवश्यक तपासण्या
पहिले महाआरोग्य शिबिर
दिनांक : १७ जून २०२६
वेळ : सकाळी ९.०० वाजता
स्थळ : आदिशक्ती मंगल कार्यालय, भैरव मंदिर जवळ, मतकरीवाडी, पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
दुसरे महाआरोग्य शिबिर
दिनांक : २७ जून २०२६
वेळ : सकाळी ९.०० वाजता
स्थळ : सुभद्रा मंगल कार्यालय, केळूस, कालवीबंदर रोड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना नागरिकांनी आभा कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
८३९०० ०५९९४
७७९८२ ९४०४८
जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
