सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घ्यावा : राजू मसूरकर
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होत आहे. या रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
रुग्णालयात डॉ. संदीप सावंत (बालरोगतज्ज्ञ व प्रभारी अधीक्षक),
डॉ. विशाल रेड्डी (हृदयरोगतज्ज्ञ),
डॉ. प्रवीण देसाई (बालरोगतज्ज्ञ),
डॉ. गिरीश चौगुले (जनरल सर्जन),
डॉ. निखिल अवधूत (अस्थिरोगतज्ज्ञ),
डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती सावंत-कुंभार व डॉ. अंजना पी (स्त्रीरोगतज्ज्ञ),
(भूलतज्ज्ञ)
डॉ. क्षमा कश्यप देशपांडे, डॉ. आत्माराम गुरुनाथ सूर्यवंशी व डॉ. विनोद तुकाराम कानगुले (भूलतज्ज्ञ) कार्यरत आहेत.
(एमबीबीएस) – आयुष वैद्यकीय अधिकारी, डॉ. अनिकेत गुरव, डॉ. ओमकार व्यंकट कोल्हे, डॉ. मानसी बालीजी बनसोडे, डॉ. वैभव मारुती बदरवाड, डॉ. दिनेश दत्तात्रेय संगेवार, डॉ. पडावट्टीअडाथिल (एमबीबीएस),
डॉ. हुमायून मणेर (दंतशल्य चिकित्सक),
डॉ. बी. एस. जोशी (नेत्रशल्य चिकित्सक),
डॉ. अभिजीत चितारी (ऑनकॉल भीषक)
तसेच डॉ. शंतनू पांडुरंग तेंडुलकर (डायलिसिस वैद्यकीय अधिकारी)
हेही रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात विविध तज्ज्ञ सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने सावंतवाडीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. नागरिकांनी या शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले आहे.
