घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेसाठी मनसेचे आर्थिक सहकार्य..
कुडाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त होल्डिंग व इतर शुभेच्छा पर कार्यक्रम न करता सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम आदेश दिले होते. याचा अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी अणाव येथील वृद्ध महिला श्रीमती शांती आणावकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले होते..
ऐन पावसाळ्यात त्वरित दुरुस्ती आवश्यक होती. त्याच्या दुरुस्ती करता आर्थिक मदत सुपुर्द केली. मनसेचे स्थानिक उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर यांनी ही बाब जिल्हाध्यक्षांकडे मांडली. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत श्रीमती शांती आणावकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते ही आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, उप तालुकाध्यक्ष अवि अणावकर व इतर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.o
