शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवेदन : Farmer ID मंजुरीसाठी तहसीलदारांना साकडे
*वैभववाडी :
वैभववाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे Farmer ID मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजना, कर्जमाफी व शेतीविषयक अनुदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिवसेना (उद्धव* *बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन देण्यात आले.*
*यावेळी तहसीलदार साहेबांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना Farmer ID मंजुरीचे काम* *युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.*
*तसेच ज्या शेतकऱ्यांसाठी Farmer ID हे कर्जमाफी, पीकविमा, कृषी अनुदान अथवा इतर शासकीय* *योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करून घ्याव्यात, जेणेकरून मंजुरी प्रक्रियेत अडथळा येणार नाही, असे आवाहनही तहसीलदारांनी केले.*
*शेतकऱ्यांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्याबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.*
*यावेळी शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख नंदु शिंदे, तालुका सचिव गुलजार काझी, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, विभागप्रमुख सुर्यकांत परब, स्वप्नील रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.*
